Mahabreaking

🔴 BREAKING
One-Day National Conference :डॉ. सिन्हा महाविद्यालयात भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात  all crops are plagued by disease :यंदा सर्वच पिकांवर रोगराई, देशाचा राजा कायम पण तणावात राहणार Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार One-Day National Conference :डॉ. सिन्हा महाविद्यालयात भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात  all crops are plagued by disease :यंदा सर्वच पिकांवर रोगराई, देशाचा राजा कायम पण तणावात राहणार Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार

Prataprao Jadhav: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर !

Prataprao Jadhav: राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे सुमारे ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ७१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची आज केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी,  आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे दिले निर्देश

बुलढाणा : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे सुमारे ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ७१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची आज केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या पाडळी, नळकुंड, उबाळखेड आणि गुळभेली या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करतांना केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे . नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे. आपत्तीग्रस्त भागांतील गावकऱ्यांनी गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना पंचनाम्यासाठी सहकार्य करुन योग्य पद्धतीने नुकसानीची पंचनाम्ये करून घ्यावेत. या पंचनाम्याचे चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना केले.
या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसिलदार अजितराव जंगम, ओमसिग राजपूत, धनंजय बारोटे, रामदास चौथंकर, अनुजा सावळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top