Two kilos of marijuana : गांजाची दुचाकीवरून वाहतुक करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत दोन किलो गांजासह 57 हजार रुपयांचा एवज जप्त केला. ही कारवाई बुलढाणा ग्रामीण पोलिस हद्दीतील गोधनखेड येथे 23 नोव्हेंबर रोजी केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई : दोघांविरुध्द गुन्हा दाखल
बुलढाणा : गांजाची दुचाकीवरून वाहतुक करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत दोन किलो गांजासह 57 हजार रुपयांचा एवज जप्त केला. ही कारवाई बुलढाणा ग्रामीण पोलिस हद्दीतील गोधनखेड येथे 23 नोव्हेंबर रोजी केली.
बुलढाणा उपविभागात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोधनखेड स्टेशनजवळ जय हॉटेल परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. चौकशी केली असता तो तरोडा (ता. मोताळा) येथील गणेश मेरसिंग साबळे (४२) असल्याचे समोर आले. त्याच्या बजाज डिस्कव्हर (MH 28 OK 1891) या दुचाकीच्या हँडलला लटकवलेल्या नायलॉन पिशवीची तपासणी केली असता हिरवट-काळसर कळीदार असा 2 किलो ५० ग्रॅम गांजा मिळाला. त्याची प्रति किलो किंमत २० हजारांप्रमाणे एकूण किंमत ४१ हजार रुपये आहे.
याशिवाय जीओ कंपनीचा मोबाईल (किंमत १ हजार) आणि दुचाकी (किंमत १५ हजार) असा एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणेश साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यावर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकाँ. दीपक लेकुरवाळे, विजय पैठणे, पोना. सुनील मिसाळ, अनंत फरताळे, पोकाँ. गजानन गोरले, अमोल वानरे, चापोका निवृत्ती पुंड व रविभिसे यांच्या पथकाने केली.

