Mahabreaking

🔴 BREAKING
Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

Illegal sand mining: रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक, टिप्पर केला जप्त

Illegal sand mining: देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत एक टिप्पर जप्त केला असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Illegal sand mining

देऊळगाव राजा पोलिसांची कारवाई ; 20 लाख 20 हजार रुपयांचा एवज केला जप्त

 देऊळगाव राजा : देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत एक टिप्पर जप्त केला असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सध्या महसूल विभाग तसेच विविध शासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असताना नदीपात्रातून अवैध रेती उपसा निर्भयपणे सुरू असल्याचे दिसत होते. २२ नोव्हेंबर रोजी एमएच २८ बीबी ९१७१ क्रमांकाचे   टिप्पर खडकपूर्णा नदीपात्रातून चिखली रोडवरील रोहणा फाटा येथे येत असताना पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आला. तत्काळ पाठलाग करून पोलिसांनी सदर टिप्पर ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी राजेंद्र विठ्ठल पिटकर, रा. चिखली याच्याविरुद्ध महाराष्ट्र गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २० लाख रुपये किमतीचे टिप्पर आणि २ ब्रास रेती (किंमत २० हजार रुपये) असा एकूण २० लाख २० हजार रुपयांचा समावेश आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top