Mahabreaking

[breaking_news]

Dr. Babasaheb Ambedkar :दुसरबीड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दुसरबीड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. आंबेडकर चौक येथील पुतळ्याच्या प्रांगणामध्ये डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता 14 एप्रिल रोजी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Dr. Babasaheb Ambedkar

 दुसरबीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दुसरबीड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. आंबेडकर चौक येथील पुतळ्याच्या प्रांगणामध्ये डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता 14 एप्रिल रोजी सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभगीय अधिकारी प्रा. संजय खडसे,    ठाणेदार संजय मातोडकर, पंडितराव खंदारे, अशोक नाना जाधव ,टी.एन मोगल ,वसंतराव उदावंत, दिलीप सदावरते आदी मान्यवर उपस्थित होते.  सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. गावातील मुख्य मार्गाने ही मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाज बांधवांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.  किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top