Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Shiva Jayanti :शिवजयंतीनिमित्त ‘ग्रीन स्पार्टन’चा वृक्षारोपण उपक्रम; शिवरायांना कृतिशील मानवंदना

Shiva Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रीन स्पार्टन’ मोहिमेच्या वतीने बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले. पारंपारिक उत्सवांपुरते मर्यादित न राहता महाराजांच्या निसर्गप्रेमी विचारांना कृतिशील मानवंदना देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Shiva Jayanti

राहुल सोनोने 

वाडेगाव: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रीन स्पार्टन’ मोहिमेच्या वतीने बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले. पारंपारिक उत्सवांपुरते मर्यादित न राहता महाराजांच्या निसर्गप्रेमी विचारांना कृतिशील मानवंदना देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

विदर्भातील वाढते तापमान व हवामान बदलाचे संकट लक्षात घेता शाश्वत भविष्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पुढील पिढीला सुरक्षित व प्रदूषणमुक्त निसर्ग देणे, हेच या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या विधायक उपक्रमात व्याळा येथील ग्रामस्थ व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी ग्रीन स्पार्टनचे ॲड. अमित तेलगोटे, सौरभ बहादूरकर, अभिजीत इंगळे, अभिजीत तेलगोटे, स्वप्नील वानखडे, अंकुश तेलगोटे, उज्ज्वल अंभोरे, शुभम वानखडे, विशाल तेलगोटे, शत्रुघ्न उपरवत आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top