Mahabreaking

[breaking_news]

Samruddhi Expressway accident :नागपूरहून मुंबईकडे जाताना काळाचा घाला; समृद्धी महामार्गावरील अपघातात एक ठार, दोघे गंभीर

Samruddhi Expressway accident : नागपूरहून मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हुंडाई ऑरा कारने पुढील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ७४ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला, तर कारमधील अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (८ ऑक्टोबर) दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २९६.६००, मुंबई कॉरिडॉर येथे घडला.

accident

समृद्धी महामार्गावर कारची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक; मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत अपघात

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा: नागपूरहून मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हुंडाई ऑरा कारने पुढील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ७४ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला, तर कारमधील अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (८ ऑक्टोबर) दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २९६.६००, मुंबई कॉरिडॉर येथे घडला.

प्राप्त माहितीनुसार, हुंडाई कंपनीची काळ्या रंगाची ऑरा कार (क्रमांक MH 01 EW 9321) नागपूरहून मुंबईकडे जात होती. या कारमध्ये चालक शोएब खान (वय ३५), नदीम खान (वय ६५) आणि नसीम खान (वय ७४, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) हे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान कारने पुढे जात असलेल्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघाताची माहिती समृद्धी महामार्गाच्या सीआरओ, छत्रपती संभाजीनगर यांनी दुपारी १.३४ वाजता दूरध्वनीद्वारे मलकापूर येथील समृद्धी महामार्ग उपकेंद्राला दिली. माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दुपारी सुमारे १.४५ वाजता पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.

अपघातात नसीम खान (वय ७४) यांचा मृत्यू झाला. तर चालक शोएब खान (वय ३५) आणि नदीम खान (वय ६५) हे गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना

अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. घटनास्थळी योग्य प्रकारे बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यामुळे काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

अपघातस्थळी पीएसआय इर्शीद मॅडम, हेड कॉन्स्टेबल २१०४, १९६२, १९१४, १२१७, चालक पोलीस कॉन्स्टेबल २६११ तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन जवान यांनी मदतकार्य केले.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, कारने पुढील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणातील पुढील तपास मेहकर पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. अपघातस्थळी करण्यात आलेली कार्यवाही दुपारी सुमारे २.३० वाजता पूर्ण करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top