Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

illegal sand :अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर जप्त, महसूल विभागाची कारवाई

illegal sand : तालुक्यातील देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रासह धरणातून अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरूच असून, महसूल विभाग सातत्याने कारवाई करत असला तरी रेती तस्कर प्रशासनाला चकवा देण्यात यशस्वी होत आहेत. ३ डिसेंबर रोजी महसूल पथकाने पांगरी परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडून पोलीस स्टेशनमध्ये जप्त केली.

illegal sand
देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रासह धरणातून अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरूच असून, महसूल विभाग सातत्याने कारवाई करत असला तरी रेती तस्कर प्रशासनाला चकवा देण्यात यशस्वी होत आहेत. ३ डिसेंबर रोजी महसूल पथकाने पांगरी परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडून पोलीस स्टेशनमध्ये जप्त केली.
खडकपूर्णा नदीपात्रात महसूल पथकाची नजर चुकवून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सिनगाव–पांगरी रस्त्यावर सापळा रचला. सकाळच्या सुमारास अवैधपणे रेती वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक MH-28 BB 9464 पाठलाग करून पकडण्यात आला. त्यानंतर वाहन जप्त करून ते देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी विजय हिरवे,ग्राम महसूल अधिकारी संजय हंडे,महसूल सेवक कविता शिरसाट यांच्या पथकाने केली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे तस्करांना चांगलाच धक्का बसला असून, पुढील काळातही अशी कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनातून देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top