Mahabreaking

[breaking_news]

Tipper transporting illegal sand :अवैध रेती वाहतूक करणारा टिप्परसह पकडला; १५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

Tipper transporting illegal sand :विनापरवाना चार ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परवर देऊळगाव राजा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. सिनगाव फाटा परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत चार ब्रास रेती आणि भारत बेंझ कंपनीचा टिप्पर असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टिप्परचालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tipper
सिनगाव फाट्यावर पहाटे पोलिसांची कारवाई; चार ब्रास रेतीसह टिप्पर जप्त

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : विनापरवाना चार ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परवर देऊळगाव राजा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. सिनगाव फाटा परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत चार ब्रास रेती आणि भारत बेंझ कंपनीचा टिप्पर असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टिप्परचालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास आरोपी संतोष बाबुराव डोईफोडे (वय ३५, रा. डोलखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना) हा भारत बेंझ कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी ७८११ मधून चार ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक करताना सिनगाव फाटा, देऊळगाव राजा येथे आढळून आला.
पोलिसांनी टिप्परची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे चार ब्रास रेती आढळून आली. या रेतीची किंमत २० हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टिप्परची किंमत १५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी रेती व टिप्पर असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय शिवाजी दराडे (ब.नं. ५३) यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी कायमी गुन्हा क्रमांक ३७१/२०२६ दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) तसेच गौण खनिज अधिनियम १९५२ मधील कलम ३ व ४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. देऊळगाव राजा पोलिसांकडून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top