Mahabreaking

[breaking_news]

Tipper seized : रेतीची अवैध वाहतुक करणारे टिप्पर जप्त, चालकाविरुध्द गुन्हा दाखल

Tipper seized : रेतालुक्यात रेतीचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू आहे. अवैध रेती वाहतुकीविरुध्द महसूल विभागाबरोबरच पोलिसांनीही धडक मोहिम सुरू केली आहे. 9 डिसेंबर रोजी रोहणा फाट्यासमोर पांढऱ्यां रंगाच्या टिप्परमधून रेतीची वाहतुक होत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी हे टिप्पर जप्त केले असून चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Tipper seized

देऊळगाव राजा पोलिसांची रोहणा फाट्यासमोर कारवाई

देऊळगाव राजा : तालुक्यात रेतीचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू आहे. अवैध रेती वाहतुकीविरुध्द महसूल विभागाबरोबरच पोलिसांनीही धडक मोहिम सुरू केली आहे. 9 डिसेंबर रोजी रोहणा फाट्यासमोर पांढऱ्यां रंगाच्या टिप्परमधून रेतीची वाहतुक होत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी हे टिप्पर जप्त केले असून चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
देऊळगाव राजा पोलिसांना रोहणा फाट्यासमोर टिप्पर क्रमांक MH-28-BB-7489 यामधून रेतीची वाहतुक होत असल्याचे आढळले. चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने चार ब्रास रेतीसह टिप्पर जप्त केले. पोलिसांनी 40 हजार रुपयांची रेती आणि 20 लाख रुपयांचा टिप्पर असा 20 लाख 40 हजार रुपयांचा एवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोहेका विजय शिवाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रविण शिवाजी डोईफोडे, वय 27 वर्षे, रा. जागदरी, ता. सिंदखेडराजा याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.   पुढील तपास  पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोहे.का. माधव कुटे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top