Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Three youths died : भरधाव एसटी बसने चिरडल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू

Three youths died : भरधाव एसटी बसने चिरडल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात  आज ५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता करडी (धाड) येथील पुलावर घडला. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की एकाचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला.

Three youths died
करडी (धाड) पुलावर दुचाकी–एसटीची समोरासमोर धडक; परिसरात शोककळा

पंडीत सावळे

धाड : भरधाव एसटी बसने चिरडल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात  आज ५ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता करडी (धाड) येथील पुलावर घडला. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की एकाचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला.

मलकापूर आगाराची एसटी बस क्रमांक MH-06-BW-3638 ही आज छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरकडे जात होती. त्याच वेळी ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे व कैलास शिंदे हे तिघे दुचाकीवरून धाडहून करडीच्या दिशेने जात होते. करडी (धाड) पुलावर येताच एसटी बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीचा चुराडा होऊन ती थेट बसखाली अडकली. तिन्ही दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या दुर्दैवी घटनेमुळे ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top