Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Sarlatai Rameshwar Bambal :रायपूर जि.प. सर्कलमध्ये उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी; उच्चशिक्षित सरलाताई रामेश्वर बांबल आघाडीवर 

Sarlatai Rameshwar Bambal : महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या रायपूर जिल्हा परिषद सर्कलवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून, उच्चशिक्षित व समाजसेवेचा ठसा असलेल्या सौ. सरलाताई रामेश्वर बांबल यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

Sarlatai Rameshwar Bambal

जनसेवेच्या पार्श्वभूमीमुळे तिकीट मिळण्याची दाट शक्यता

बुलढाणा : महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या रायपूर जिल्हा परिषद सर्कलवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून, उच्चशिक्षित व समाजसेवेचा ठसा असलेल्या सौ. सरलाताई रामेश्वर बांबल यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
रायपूर जि.प. सर्कल अंतर्गत एकूण १३ ग्रामपंचायती असून, मागील दोन निवडणुकांपासून या सर्कलला उच्चशिक्षित जिल्हा परिषद सदस्य लाभलेला नाही. त्यामुळे यावेळी मतदारसंघात सुशिक्षित, सर्वसमावेशक व सर्वपक्षीयांना स्वीकारार्ह उमेदवाराची मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून गजानन अंबादास बांबल हे ‘हॉटेल मराठा’च्या माध्यमातून रायपूर सर्कलमधील विविध गावांतील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवाराशी सतत संपर्कात आहेत. तसेच गजानन बांबल हे पळसखेड भट येथील स्व. नारायण गुळवे यांचे भाचे व जावई व माजी सरपंच शेषराव गुळवे व गुळवे कुटुंबाचे दाजी असल्याने रायपूर सर्कलमधील बहुतेक गावांत बांबल कुटुंबाचे भक्कम सामाजिक संबंध आहेत.
गजानन बांबल यांचे लहान बंधू रामेश्वर अंबादास बांबल हे गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा परिषद बुलढाणा येथे कार्यरत असून, MSW (समाजकार्य) विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. नोकरी करत असतानाही समाजसेवा हेच त्यांचे मूळ ध्येय राहिले आहे. दोन्ही भावांनी जनतेच्या अडचणींमध्ये नेहमीच पुढाकार घेतल्याने रायपूर सर्कलमध्ये त्यांची ओळख समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून आहे.
या पार्श्वभूमीवर रामेश्वर बांबल यांच्या पत्नी सौ. सरलाताई रामेश्वर बांबल यांना रायपूर जि.प. सर्कलमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. समाजशास्त्र विषयात पदवीधर असलेल्या सरलाताई रामेश्वर बांबल या उच्चशिक्षित असून, त्यांच्या रूपाने रायपूर सर्कलला सुशिक्षित महिला नेतृत्व मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यासंदर्भात गजानन बांबल यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, “रायपूर सर्कलमधील सर्व समाजघटक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच मुस्लिम बांधवांशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत. जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्यास आम्ही ती नक्कीच सोन्यात रूपांतरित करू. त्यामुळे माझ्या लहान भावाची पत्नी सौ. सरलाताई रामेश्वर बांबल यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे.”
विकासाचा मुद्दा, जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याची तत्परता आणि समाजाशी थेट संवाद हे सूत्र समोर ठेवून बांबल कुटुंबीयांनी रायपूर जि.प. सर्कलमध्ये आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, येणाऱ्या निवडणुकीत हा सर्कल राजकीयदृष्ट्या चांगलाच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top