Mahabreaking

[breaking_news]

 illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड

illegal Kharra : अवैध खर्रा तयार करुन विक्री करणार्या तिघांवर माना पोलिसांनी धडक कारवाई करीत एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ही  कारवाई करण्यात आली. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

illegal Kharra

 ऑपरेशन प्रहार अंतर्गत माना पोलिसांची धडक कारवाई : १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मूर्तिजापूर : अवैध खर्रा तयार करुन विक्री करणार्या तिघांवर माना पोलिसांनी धडक कारवाई करीत एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ही  कारवाई करण्यात आली. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

माना पोलीस स्टेशन अंतर्गत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा तयार करून गुटखा व पानमसाला विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपी अजहर शहा जफर शहा (वय ३९), आनंद भगवान सावळे (वय २९) आणि  इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन (किंमत रु. २५,०००) तसेच सुगंधित तंबाखू, पानमसाला, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल किंमत  ७६ हजार ३८३असा एकूण १ लाख १ हजार ३८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस स्टेशन माना येथे  अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २२३, २७४, २७५, १२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलाकडून नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रविंद्र सोळंके यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top