Mahabreaking

[breaking_news]

case registered :प्रेमसंबंधातील फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा

case registered : प्रेमसंबंधातून मिळालेली छायाचित्रे व व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग कुटुंबीयांना पाठवून लग्न मोडून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

intimate photos viral

 व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग पाठविण्याची धमकी; युवकासह मित्राविरुद्ध कारवाई

मोताळा : प्रेमसंबंधातून मिळालेली छायाचित्रे व व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग कुटुंबीयांना पाठवून लग्न मोडून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादीचे लग्न खामगाव येथील एका युवकासोबत ठरल्यानंतर संबंधित प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, आरोपी चेतन प्रकाश सातव (रा. कोथळी, ता. मोताळा) याचे फिर्यादीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. या काळात फिर्यादीने त्याला पाठविलेली छायाचित्रे तसेच व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलदरम्यान तिच्या संमतीशिवाय करण्यात आलेले स्क्रीन रेकॉर्डिंग कुटुंबीयांना पाठवून तिचे लग्न मोडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच दुसरा आरोपी ऋषीकेश सुरडकर (रा. कोथळी) याने फिर्यादीला फोन करून चेतन सातव याच्याशी बोलण्यासाठी दबाव टाकल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. ही घटना २९ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले असून, याप्रकरणी ७ जून रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top