Mahabreaking

[breaking_news]

Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास

Loot Valuables Worth  :गावात चोरट्यांचा हैदोस सुरू असून घर फोडून चोरट्यांनी १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास केल्याची घटना १३ एप्रिल रोजी उघडकीस आली.या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Loot Valuables Worth

डोणगाव : गावात चोरट्यांचा हैदोस सुरू असून घर फोडून चोरट्यांनी १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास केल्याची घटना १३ एप्रिल रोजी उघडकीस आली.या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

डोणगाव येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये खंडोबा परिसरात राहणारे  डॉ. गजानन प्रल्हादराव पातुरकर यांचे घर अज्ञात चोरट्यांनी ९एप्रिल ते १३ एप्रिलच्या फोडले. घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच     घरातील बेड रुममधील कपाटातील  एक सोन्याची वेढा अंगठी 07 ग्रॅम किं अं 21000/ रुपये , एक सोन्याची अंगठी वजन 04 ग्रॅम किं अ 28000/ रु , एक लेडीज खड़ा अंगठी वजन 04 ग्रॅम कि अं 12000/रु , सोन्याचे कानातील झुमके वजन 05 ग्रॅम किं अं 15000 रुपये , कानातील बास्केअ रिंग वजन 09 ग्रॅम किंमती अं 27000/रु , कानातील रिंग वजन अं 03 ग्रॅम किं अं 9000/रु , एक सोन्याची नथ वजन अर्धा ग्रॅम किं अं 1500 रुपये , एक सोन्याचे गंठण वजन अं 20 ग्रॅम किं अं 60000/रुपये असा एकुण 1लाख 73 हजार रुपयांचा एवज लंपास केला.  डॉ. पातुरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द  कलम कलम 331(3), 331(4),305 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका संजय धिके याच्याकडे देण्यात आला आहे.

सोन्याची किंमत लाखो रुपयात

चोरट्यांनी लंपास केलेले सोने बाजच्या बाजारभावानुसार लाखो रुपयांचे आहे. मात्र, पोलिसांनी मागील पावतीवरील भावानुसार सोन्याची किंमत लावली आहे. डॉ. पातुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझे जवळपास साडे दहा तोळे सोने व अर्धो किलो चांदी चे वेगवेगळे साहीत्य चोरी गेल्याचे सांगितले.   पावत्या जेवढयाच्या आहे तेवढीच तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top