Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Thieves Burglarize Wine Shop :देऊळगाव महीत चोरट्यांनी वाईन शॉप फोडले, २.४९ लाखांचा मुद्देमाल केला लंपास

Thieves Burglarize Wine Shop : तालुक्यातील ग्राम देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्यांनी वाईन शॉप फोडून  २ लाख ४९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ६ एप्रिल रोजी रात्री ९.४५ ते ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० या कालावधीत घडली. या प्रकरणी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाख्ल केला आहे.

Thieves Burglarize Wine Shop

दारूच्या ५७ बॉक्ससह DVR, बॅटरी आणि रोकड चोरी; अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल

गजानन तिडके

 देऊळगाव राजा : तालुक्यातील ग्राम देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्यांनी वाईन शॉप फोडून  २ लाख ४९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ६ एप्रिल रोजी रात्री ९.४५ ते ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० या कालावधीत घडली. या प्रकरणी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाख्ल केला आहे.

देऊळगाव मही येथील वाईन शॉपीत चोरट्यांनी ६ एप्रिल रोजी रात्री ९.४५ ते ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० या कालावधीत प्रवेश करून केला. तसेच दुकानातून देशी दारू ‘सखू संत्रा’ कंपनीच्या १८० एमएलच्या ४८ बाटल्यांचे ५७ बॉक्स, प्रत्येकी ₹३,२४० प्रमाणे एकूण ₹१,८४,६८० किमतीचा माल चोरून नेला. याशिवाय ९० एमएलच्या ७२ बाटल्या (₹२,८८०), जुना DVR (₹८,०००), टीव्ही स्क्रीन (₹३,०००), इन्व्हर्टर बॅटरी (₹७,०००) आणि गल्ल्यातील ₹६,३०० ची रोकड असा एकूण ₹२,११,८६० चा मुद्देमाल लंपास केला.  याचवेळी समोरील नंदनवन वाईन बार येथूनही ₹३८,००० किमतीचा माल चोरीला गेला, त्यामुळे दोन्ही ठिकाणचा एकत्रित मुद्देमाल ₹२,४९,८६० इतका आहे.

या प्रकरणी कृष्णा भगवान खंदारे (वय २६, व्यवसाय मॅनेजर, रा. गारखेड, ता. देऊळगाव राजा) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.   या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.चोरीची माहिती मिळताच ठाणेदार ब्रम्हा गिरी यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.

सलग दारू दुकान आणि समोरील वाईन बार या दोन्ही ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top