Mahabreaking

[breaking_news]

Theft of donation box: धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघड

Theft of donation box: बुलढाणा तालुक्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथील श्री गजानन महाराज-साईबाबा संस्थान मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी धाड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल केली. या कारवाईत आरोपीला अटक करून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Theft of donation box

 धाड पोलिसांची दमदार कामगिरी  मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद; १०० टक्के मुद्देमाल हस्तगत

पंडित सावळे

मासरूळ: बुलढाणा तालुक्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथील श्री गजानन महाराज-साईबाबा संस्थान मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी धाड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल केली. या कारवाईत आरोपीला अटक करून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी समाधान छगन पायधन (वय ५९, व्यवसाय – मजुरी, रा. धामणगाव, ता. जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाड पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक ३११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना धाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध लावला. या कारवाईत निलेश गणेश माहाले (वय ३३, रा. धामणगाव, ता. जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

मंदिरातून चोरट्यांनी लोखंडी दानपेटी – अंदाजे किंमत ₹१,५००, दानपेटीतील रोख रक्कम – ₹६,००० असा एकूण चोरीस गेलेला मुद्देमाल : ₹७,५०० असा जप्त केला. पोलिसांनी हा सर्व एवज चोरट्यांकडून जप्त केला.

धाड पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपासामुळे चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे (प्रभारी अधिकारी, धाड पोलीस ठाणे), सहायक फौजदार प्रभाकर लोखंडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज मुळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top