Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

bitten by a snake :सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

bitten by a snake : बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा साप्ताहिकाचे संपादक रमेश समुद्रे यांच्या पत्नी शिलाबाई रमेश समुद्रे (वय ४९) यांचा सर्पदंशानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

bitten by a snake

बोरगाव मंजू येथे शोककळा; तीन दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा साप्ताहिकाचे संपादक रमेश समुद्रे यांच्या पत्नी शिलाबाई रमेश समुद्रे (वय ४९) यांचा सर्पदंशानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिलाबाई समुद्रे या दि. ३१ जानेवारी (शनिवार) रोजी बोरगाव मंजू शेतशिवारात इतर महिलांसोबत कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शेतात काम करत असतानाच त्यांना विषारी सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच सोबत असलेल्या महिलांनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाच दि. २ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास शिलाबाई समुद्रे यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे तीन दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, मात्र अखेर ती झुंज अपयशी ठरली.

या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू शहरात शोककळा पसरली आहे. शिलाबाई समुद्रे या अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाच्या असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. दरम्यान, सोमवारी येथील मोक्षधामात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेस धार्मिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top