Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

the bus went off the road :रस्त्याच्या कामाचा अंदाज चुकला; बस चारीत उतरली,  पाच ते सहा प्रवासी जखमी

the bus went off the road : रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे खड्डे व मातीचा अंदाज न आल्याने खेडी–कोऱ्हाला दरम्यान रस्त्याशेजारील खोल चारीत उतरली.त्यामुळे, बसमधील सुमारे पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता घडली.

the bus went off the road

मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा बसला अपघात, रखडलेल्या रस्ता कामामुळे वाढले अपघात

धामणगाव बढे :  रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे खड्डे व मातीचा अंदाज न आल्याने खेडी–कोऱ्हाला दरम्यान रस्त्याशेजारील खोल चारीत उतरली.त्यामुळे, बसमधील सुमारे पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  बस क्रमांक  MH 40 N 9486 ही  कुऱ्हा गोतमारा येथून मलकापूरकडे परत येत होती. सध्या या मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूने काम सुरू असल्याने वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती. मात्र, रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या भरावाचा अंदाज चालक सुरडकर यांना न आल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याशेजारील खोल चारीत उतरली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते. बस चारीत गेल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात सुमारे पाच ते सहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात रवाना केले.

मलकापूर–कुऱ्हा गोतमारा रस्त्याचे काम रेंगाळलेले असून सुरक्षा नियमांचे पालन न करता मातीचा उपसा व भराव केल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भर रस्त्यात साचलेल्या मातीमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top