Mahabreaking

[breaking_news]

On-site inspection :निवडणुकीतील शब्दपूर्तीची दिशा : मेहकरात २२ सार्वजनिक शौचालयांसाठी प्रत्यक्ष पाहणी

On-site inspection : नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवत मेहकर नगरपरिषदेने शहरातील नागरी सुविधा बळकटीकरणाच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. बुधवारी शहरातील विविध भागांमध्ये २२ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह व सुलभ शौचालये उभारण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी व निरीक्षण करण्यात आले.

On-site inspection

नगराध्यक्ष किशोर गारोळेंचा विकासावर भर; १.६० कोटींच्या कामांना गती

मेहकर : नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवत मेहकर नगरपरिषदेने शहरातील नागरी सुविधा बळकटीकरणाच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. बुधवारी शहरातील विविध भागांमध्ये २२ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह व सुलभ शौचालये उभारण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी व निरीक्षण करण्यात आले.

या पाहणीदरम्यान नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नगरसेवक, अधिकारी व संबंधित कंत्राटदारांसोबत सर्व प्रस्तावित ठिकाणांची पाहणी केली. नागरी स्वच्छता, आरोग्य आणि महिलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणारा हा उपक्रम नगरपरिषदेच्या विकासाभिमुख धोरणाचा ठळक प्रत्यय असल्याचे यावेळी दिसून आले.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून, या माध्यमातून मेहकर शहरातील सार्वजनिक स्वच्छता सुविधा अधिक सक्षम केल्या जाणार आहेत. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, खुले शौचमुक्त शहराचा संकल्प प्रत्यक्षात उतरवणे तसेच स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित मेहकर घडवणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या प्रकल्पामुळे विशेषतः महिला, वृद्ध, दिव्यांग व शहरात येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, सार्वजनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे मेहकरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या पाहणी व निरीक्षण प्रक्रियेदरम्यान नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक विलास चनखोरे, नितीन तुपे, महेश रिंढे, सतीश ताजने, निसार अन्सारी, आकाश घोडे, नगरपरिषदेचे अधिकारी, कंत्राटदार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषद निवडणुकीत दिलेले आश्वासन केवळ घोषणापुरते न ठेवता प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असल्याने, शहरातील विकासाच्या राजकारणाला नवी दिशा मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top