Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

The Raja Shivchhatrapati Vicharmanch : राजा शिवछत्रपती विचारमंचतर्फे जिजाऊभक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था

The Raja Shivchhatrapati Vicharmanch : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राजा शिवछत्रपती विचारमंच यांच्या वतीने यंदाही राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सिंदखेडराजा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या जिजाऊभक्तांसाठी पोहे व चहा यांची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

The Raja Shivchhatrapati Vicharmanch
सलग ११ वर्षांपासून अखंडित सेवा; सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम

देऊळगाव मही : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राजा शिवछत्रपती विचारमंच यांच्या वतीने यंदाही राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सिंदखेडराजा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या जिजाऊभक्तांसाठी पोहे व चहा यांची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिलांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर विचारमंचाच्या सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

सामाजिक सलोखा जपणारे व समतावादी बहुजन विचारांचा वारसा पुढे नेणारे राजा शिवछत्रपती विचारमंच मागील ११ वर्षांपासून सातत्याने हा पोहे-चहा वाटपाचा उपक्रम राबवीत आहे. परिसरातील हा एकमेव सामाजिक उपक्रम असून, यावर्षीही सिंदखेडराजाकडे जाणाऱ्या हजारो जिजाऊभक्तांनी या अल्पोपहाराचा लाभ घेतला.

या उपक्रमाचे विविध शहरांतून व ग्रामीण भागातून आलेल्या जिजाऊभक्तांनी मनापासून कौतुक केले. “असा सामाजिक उपक्रम कायम सुरू राहावा,” अशी अपेक्षाही भाविकांनी व्यक्त केली.

विचारमंच अध्यक्ष राम वसंतराव शिंगणे, उपाध्यक्ष रंगा शिंगणे, संभाजी राजे शिंगणे, ॲड. आदिल एच. पठाण, बळीराम शिंगणे, सचिव रवी मुळे, दीपक शिंगणे, प्रवक्ते गजू शिंगणे, संजय आंधळे, समाधान पवार, सचिन नागरे, सचिन शिंगणे, किशोर शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, शेख रईस, रघु शिंगणे, देवा पाटील शिंगणे, नाना हिवाळे, अभि शिंगणे, संदीप नागरे, गौरव सोनसळे, संतोष वाघ, नितेश पालवे, शिवा इंगळे, पुरुषोत्तम शिंगणे, बालाजी गावंडे, सचिन पाटील दहातोंडे, गणेश आंधळे, मंगेश भुतेकर, ज्ञानू शिंगणे, अमोल शिंदे, गणेश शिंगणे, राम जिजोते, यश, ओम यांच्यासह राजा शिवछत्रपती विचारमंचाच्या सर्व विश्वस्त व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top