Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Journalists’ Association :डोणगाव पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सचिन गाभणे 

Journalists’ Association :डोणगाव पत्रकार संघाची नव्याने गठीत करण्यात आलेली कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी सचिन गाभणे, उपाध्यक्षपदी ॲड. जैनुल आबेद्दीन शेख तर सचिवपदी सुबोध आखाडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या घोषणेमुळे डोणगावसह संपूर्ण परिसरातील पत्रकार बांधवांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dongav Journalists

 ॲड. जैनुल आबेद्दीन शेख यांची उपाध्यक्षपदी तर सुबोध आखाडे सचिवपदी निवड

डोणगाव : डोणगाव पत्रकार संघाची नव्याने गठीत करण्यात आलेली कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी सचिन गाभणे, उपाध्यक्षपदी ॲड. जैनुल आबेद्दीन शेख तर सचिवपदी सुबोध आखाडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या घोषणेमुळे डोणगावसह संपूर्ण परिसरातील पत्रकार बांधवांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dongav Journalist

पत्रकार संघ ही केवळ संघटना नसून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारी, प्रशासन व जनतेमध्ये सेतू निर्माण करणारी महत्त्वाची चळवळ आहे. अशा या जबाबदारीच्या संघटनेचे नेतृत्व अनुभवी, अभ्यासू व कार्यतत्पर व्यक्तींकडे सोपविण्यात आल्याने संघ अधिक सक्षम, संघटित व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास पत्रकार व नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

या कार्यकारिणी व मार्गदर्शक मंडळात दिनोरे सर, अशोकवराव वानखेडे, सुरेशसिंह चव्हाण, सुनील पळसकर, जमील पठाण, जमीर शाह, यासीन बेग, राजेश वाघमारे, सुरेशभाऊ फिस्के, गजानन वाघमारे, गणेश लहाने, आवेज पठाण तसेच विजय खरात यांचा समावेश आहे. सर्व सदस्यांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव संघाच्या कार्याला निश्चितच बळ देणारा ठरणार आहे.

नव्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, व्यावसायिक अडचणींचे निराकरण, पत्रकारांवरील अन्यायाविरोधात ठाम भूमिका, तसेच सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांवर सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही संकेत देण्यात आले.

डोणगाव परिसरातील विकासकामे, प्रशासनातील त्रुटी, सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती निर्भयपणे मांडत सत्यनिष्ठ, जबाबदार व लोकाभिमुख पत्रकारिता अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

या निवडीबद्दल विविध स्तरांतून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. अध्यक्ष सचिन गाभणे, उपाध्यक्ष ॲड. जैनुल आबेद्दीन शेख, सचिव सुबोध आखाडे यांच्यासह डोणगाव पत्रकार संघाचे कार्य आगामी काळात प्रेरणादायी, प्रभावी व समाजहितकारी ठरो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top