Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

The Mahabodhi Mahavihara :महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे; दिल्लीतील जनआंदोलनात सहभागी व्हा – मिलिंद वानखडे

The Mahabodhi Mahavihara :भारतासह संपूर्ण विश्वातील बौद्धांसाठी अत्यंत पवित्र व प्रेरणास्थान असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार सध्या बी.टी. अ‍ॅक्ट १९४९ च्या आधारे बेकायदेशीररीत्या अन्य घटकांच्या ताब्यात असल्याचा आरोप करण्यात येत असून, हा अन्याय दूर करण्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धम्मध्वज यात्रा बुलढाणा शहर समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी केले आहे.

The Mahabodhi Mahavihara

धम्मध्वज यात्रा बुलढाणा शहर समन्वय समितीचे आवाहन

बुलढाणा : भारतासह संपूर्ण विश्वातील बौद्धांसाठी अत्यंत पवित्र व प्रेरणास्थान असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार सध्या बी.टी. अ‍ॅक्ट १९४९ च्या आधारे बेकायदेशीररीत्या अन्य घटकांच्या ताब्यात असल्याचा आरोप करण्यात येत असून, हा अन्याय दूर करण्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धम्मध्वज यात्रा बुलढाणा शहर समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी केले आहे.

तथागत भगवान गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्व प्राप्त झालेले हेच महाबोधी महाविहाराचे पवित्र स्थळ असून, या ऐतिहासिक महाविहाराची स्थापना महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी केली होती. या महाविहाराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. मात्र सध्या बी.टी. अ‍ॅक्ट १९४९ च्या तरतुदींमुळे महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांच्या हाती नसून, याठिकाणी कर्मकांडाच्या माध्यमातून या स्थळाच्या पावित्र्यावर गदा येत असल्याचा आरोप बौद्ध संघटनांकडून करण्यात येत आहे.

बी.टी. अ‍ॅक्ट १९४९ रद्द करून महाबोधी महाविहार पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात द्यावा तसेच महाविहार व्यवस्थापन समितीमध्ये सर्व सदस्य हे बौद्धच असावेत, या प्रमुख मागण्यांसाठी पूज्य भंते विनाचार्य व भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह देशभर धम्मध्वज जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला बुलढाणा शहरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

या मागण्यांकडे शासन-प्रशासन व देशाच्या सर्वोच्च संसद सदस्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ पासून दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर भव्य जनआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रासह देशभरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

बुलढाणा शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त बौद्ध अनुयायांनी आपले अस्तित्व, अस्मिता व वारसा टिकवण्यासाठी दिल्लीतील या ऐतिहासिक जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मिलिंद वानखडे यांच्यासह धम्मध्वज यात्रा बुलढाणा शहर समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या सर्व बौद्ध अनुयायांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजन समितीकडून करण्यात येणार असून, अधिक माहितीसाठी अथवा अडचणीसाठी ९८५०३७३५०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top