Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

The Lifetime Achievement Award :सिंदखेडराजा येथे २५ डिसेंबर रोजी जीवन गौरव पुरस्कार सोहळा

The Lifetime Achievement Award :सिंदखेडराजा येथील डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने दि. २५ डिसेंबर रोजी जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक व सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, यामध्ये साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती वेदांतचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

The Lifetime Achievement Award

साखरखेर्डा येथील सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांचा विशेष सन्मान

साखरखेर्डा : सिंदखेडराजा येथील डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने दि. २५ डिसेंबर रोजी जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक व सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, यामध्ये साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती वेदांतचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून, दरवर्षी सिंदखेडराजा येथे मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते. यावर्षीही कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात वेदांतचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेर्डा), डॉ. इकबाल मेमन ऑफिसर (अध्यक्ष, वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन, मुंबई), टी. एन. भाल (मॅनेजिंग डायरेक्टर, रेड स्वास्तिक, नागपूर) यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना युमन आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झवर, डॉ. अमजदखान पठाण, अयाज खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.हा भव्य पुरस्कार सोहळा सिंदखेडराजा येथील हजरत गौस-ए-आझम दस्तगीर बाबा दर्गा परिसरात पार पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top