Mahabreaking

[breaking_news]

  soybeans :शेतकरी जेवायला घरी गेला अन् चोरट्यांनी सोयाबीनचे नऊ कट्टे केले लंपास!

soybeans : दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आता शेतमाल चोरीच्या घटनांमुळे वाढताना दिसत आहेत. पातूर-बाळापूर मार्गालगत असलेल्या देऊळगाव येथील शेतातून सोयाबीनचे नऊ कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. या चोरीमुळे शेतकरी शिवहरी उत्तम बदरखे यांचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

soybeans

दुष्काळाने कंबरडे मोडले, चोरट्यांनी शेतमाल पळविला! देऊळगावात शेतकऱ्याचे ६० हजारांचे नुकसान

राहुल सोनोने

दिग्रस बु. : दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आता शेतमाल चोरीच्या घटनांमुळे वाढताना दिसत आहेत. पातूर-बाळापूर मार्गालगत असलेल्या देऊळगाव येथील शेतातून सोयाबीनचे नऊ कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. या चोरीमुळे शेतकरी शिवहरी उत्तम बदरखे यांचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकरी घरी जाताच चोरट्यांनी साधली संधी

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी शिवहरी बदरखे यांनी आपल्या शेतातील वाळवलेले सोयाबीन गोळा करून ते कट्ट्यांमध्ये भरण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी सोयाबीनचे नऊ कट्टे भरून ठेवले होते. उर्वरित सोयाबीन भरण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, रात्रीच्या जेवणासाठी बदरखे घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी संधी साधून शेतात भरून ठेवलेले सोयाबीनचे नऊ कट्टे चोरून नेले. जेवण आटोपून ते पुन्हा शेतात परतले असता सोयाबीनचे कट्टे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी मुलगा शंकर शिवहरी बदरखे यांना या घटनेची माहिती दिली. शंकर यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता सोयाबीन चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी वाहनाच्या टायरचे निशाणही आढळून आले.

पातूर पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच शंकर बदरखे यांनी पातूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

शेतमालाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

आधीच दुष्काळ आणि नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सोयाबीन चोरीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. दिवसरात्र मेहनत करून पिकविलेला शेतमाल डोळ्यांसमोरून चोरीला गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतमालाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन चोरीला गेलेला माल परत मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top