Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

The District Collector :थकबाकीदारांवर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा! महसूल व गौण खनिज दंड वसुलीसाठी सक्तीची मोहीम सुरू

The District Collector : जिल्ह्यातील प्रलंबित जमीन महसूल आणि थकीत करांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल यंत्रणेला कडक आदेश दिले आहेत. आता प्रशासनाकडून सक्तीची वसुली राबवली जाणार असून थकबाकीदारांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई अपरिहार्य असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. विशेषतः गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत सर्व प्रलंबित दंड तातडीने वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

The District Collector

बुलढाणा : जिल्ह्यातील प्रलंबित जमीन महसूल आणि थकीत करांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल यंत्रणेला कडक आदेश दिले आहेत. आता प्रशासनाकडून सक्तीची वसुली राबवली जाणार असून थकबाकीदारांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई अपरिहार्य असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. विशेषतः गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत सर्व प्रलंबित दंड तातडीने वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महसूल विभागाच्या बैठकीत डॉ. पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी पथकांना गावोगावी जाऊन थेट वसुली करण्याचे आदेश देण्यात आले असून वारंवार मुदत देऊनही कर व दंड न भरणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी प्रशासकीय कारवाई व वाढत्या दंडात्मक बोजापासून बचाव करण्यासाठी आपला थकीत जमीन महसूल, कर आणि गौण खनिज दंड त्वरित भरावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. वसुली मोहीम आता अधिक तीव्र करण्यात येणार असून गावपातळीवर दररोज आढावा घेत कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. विकासकामांसाठी शासकीय महसूल अत्यावश्यक असल्याने वसुली प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top