Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

The delegation of Buddhist nuns :थायलंडच्या भिक्खुनी संघाचे बोरगाव मंजूमध्ये भव्य स्वागत; धम्मचर्चा व प्रार्थनेने परिसर धम्ममय

The delegation of Buddhist nuns : येथील सिद्धार्थनगरमधील स्थानिक अनाथ चिंश्क बुद्ध विहारात दि. १ जानेवारी २०२६ रोजी थायलंड येथून आलेल्या आंतरराष्ट्रीय भिक्खुनी संघाचे बौद्ध उपासक-उपासिका व धम्मप्रेमींच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. धम्मचर्चा, सामूहिक प्रार्थना व सुत्तपाठामुळे संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता.

The delegation of Buddhist nuns

बोरगाव मंजु : येथील सिद्धार्थनगरमधील स्थानिक अनाथ चिंश्क बुद्ध विहारात दि. १ जानेवारी २०२६ रोजी थायलंड येथून आलेल्या आंतरराष्ट्रीय भिक्खुनी संघाचे बौद्ध उपासक-उपासिका व धम्मप्रेमींच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. धम्मचर्चा, सामूहिक प्रार्थना व सुत्तपाठामुळे संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, अडकी (अकोला) येथून सकाळी ९ वाजता थायलंडच्या आंतरराष्ट्रीय भिक्खुनी संघाचे बोरगाव मंजूमध्ये मंगलमय आगमन झाले. गावातील मुख्य मार्गावरून १०९ भिक्खुनींची भव्य पदयात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पगुच्छ अर्पण करून, धम्मदीप पाठशाळेच्या मुलींनी लेझीम प्रात्यक्षिक सादर करत भिक्खुनी संघाचे स्वागत केले. बोरगाव मंजु व परिसरातील उपासक-उपासिका, विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

The delegation of Buddhist nuns

भिक्खुनी संघ गावात दाखल होताच परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. “बुद्धं शरणं गच्छामी”च्या मंगल जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थित उपासक-उपासिकांनी बुद्ध, धम्म व संघ यांना वंदन करून त्रिशरण व पंचशीलाचे पालन केले. भिक्खुनी संघाच्या चेहऱ्यावरील शांतता व करुणा पाहून नागरिक भारावून गेले.

या विशेष कार्यक्रमात अय्याजी भिक्खुनी वियुतीयाना (त्रिपिटक महिंदा संचमिता फलाबोधी महाथेरो), भिक्खुनी विन्जा विमुती, भिक्खुनी विरावटना, भिक्खुनी समुद तेजना, भिक्खुनी वितक्का-विचारा, अय्याजी भिक्खुनी विशाखा, भिक्खुनी अभिन्ना, भिक्खुनी सुनंदाबोधी, भिक्खुनी करुणाशिला यांच्यासह भंते शिलरत्न, भंते अरिमैत्री पलसो बढे, भंते अमरज्योती (बोरगाव मंजु) व भंते प्रशिलरत्न (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामूहिक बुद्धवंदना व सुत्तपाठ करण्यात आला. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

भिक्खुनी संघाने उपस्थितांना मार्गदर्शन करताना भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश, धम्माचे मानवी जीवनातील महत्त्व, चारिका व धम्मदेशना, तसेच बुद्धतत्त्वज्ञानाचा प्रचार-प्रसार याविषयी सविस्तर माहिती दिली. भारत व थायलंड या दोन देशांतील सांस्कृतिक व धार्मिक नाते अधिक दृढ व्हावे, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी बुद्ध धम्मगुरूंची प्रवचने, प्रश्नोत्तरे, पिंडपात सोहळा पार पडला. तसेच आलेल्या उपासिकांना श्रामनेरी शिबिराविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. भोजनदानाच्या माध्यमातून दान, शील व भावना यांचा त्रिवेणी संगम साधण्यात आला.

हा भव्य धम्मकार्यक्रम आम्रपाली महिला संघ, सिद्धार्थनगर युवक मंडळ (बोरगाव मंजु), सुजाता महिला संघ (भीमनगर), विशाखा महिला संघ व तरुण नवयुवक मंडळ (रामजीनगर, बोरगाव मंजु) यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमात बोरगाव मंजु परिसरातील संपूर्ण बौद्ध समाजासह इतर सामाजिक बांधवांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top