Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Sharad Pawar School :शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बालआनंद मेळावा उत्साहात 

Sharad Pawar School :मासरूळजवळील शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरुड येथे शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, या उद्देशाने बालआनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

Sharad Pawar School

पंडित सावळे

मासरूळ  : मासरूळजवळील शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरुड येथे शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, या उद्देशाने बालआनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कुणी कीर्तनकार, कुणी राजस्थानी पेहरावात, कुणी ‘जय मल्हार’ मालिकेतील खंडेरायच्या भूमिकेत तर काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सावित्रीबाई फुले तसेच चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषा साकारत थेट व्यासपीठावर अवतरण केले.

मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख श्री. वैराळकर सर यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. के. टी. तायडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून म.पु.मा. शाळा, वरुड येथील मुख्याध्यापक श्री. भुते सर उपस्थित होते. यावेळी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या आनंद मेळाव्यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल उभारले होते. यामध्ये शेतमाल विक्री, किराणा माल, खाद्यपदार्थ, गोळ्या-चॉकलेट आदींच्या स्टॉलचा समावेश होता. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना चालना देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत राजकारणी, समाजसुधारक आदींची रूपे साकारली. स्पर्धात्मक भागात आठवीच्या रूपाली पिंपळे, दिपाली मघाडे व गायत्री उगले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक गायत्री काळे हिने मिळविला, तर तृतीय क्रमांक गीता उबाळे, दिव्या काळे व पूनम काळे यांनी मिळविला.

मेळाव्यात चमचा-लिंबू, संगीत खुर्ची, तीन पायांची शर्यत, धावण्याची शर्यत आदी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

यावेळी गावातील सरपंच पती अमोल बुरजे, प्रकाश राऊत, अरुण पिंपळे, राजेंद्र अपार, शिवदास गोरे, परसराम काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. आर. सीताफळे, पी. बी. गाढे, एस. पी. वारे, एस. बी. पवार, ए. ए. जेऊघाले, के. आर. कांडेले, डी. एस. जाधव, जे. बी. कोल्हे, एन. बी. तरमळे, एस. यू. पालकर, राऊत मॅडम, पी. के. सावळे, ए. एन. शिंदे, यू. आर. मघाडे आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top