Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

two offices in two days :लाडक्या बहिणींचा संताप उसळला; दोन दिवसांत दोन कार्यालयांवर धडक

two offices in two days : मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिलांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात स्पष्ट झाले आहे. ई-केवायसी पूर्ण करूनही दोन महिन्यांचे अनुदान न मिळाल्याने लाडक्या बहिणींचा संयम सुटला असून, सलग दोन दिवस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

The beloved sisters'

 सोमवारी महिला-बालविकास, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन; ई-केवायसीतील घोळामुळे ३० हजार महिलांचा लाभ अडकला

बुलढाणा : मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिलांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात स्पष्ट झाले आहे. ई-केवायसी पूर्ण करूनही दोन महिन्यांचे अनुदान न मिळाल्याने लाडक्या बहिणींचा संयम सुटला असून, सलग दोन दिवस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवांनी आगीत तेल ओतले. त्यामुळे सोमवारी शेकडो महिलांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयावर धडक दिली, तर मंगळवारी खामगाव येथील महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनाला जाब विचारला. या आंदोलनाला ओबीसी महासंघाचा जाहीर पाठिंबा मिळाला असून, विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्ह्यात सुमारे ६.५ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे जवळपास ३० हजार महिलांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आला आहे. ई-केवायसी अपूर्ण राहणे, चुकीचा पर्याय निवडला जाणे, माहितीअभावी झालेल्या नोंदींच्या चुका, आधार-बँक खात्यांची जुळवणी न होणे ही कारणे प्रशासनाने पुढे केली आहेत. या घोळामुळे जिल्ह्यातील सुमारे १० टक्के अर्ज नामंजूर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

“सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे खात्यात का जमा होत नाहीत?” असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केला. सोमवारी महिला-बालविकास कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली होती. लाभ बंद झाल्याच्या अफवेमुळे महिलांमध्ये प्रचंड संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, मंगळवारी खामगाव येथील संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. तब्बल तासभर प्रशासनाला घेराव घालण्यात आल्याने यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. ओबीसी महासंघाचे नेते गणेश चौकशे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी निवेदन व तक्रार अर्ज सादर केले.

 

आंदोलनकर्त्यांनी यावेळी  ई-केवायसी दुरुस्तीसाठी स्वतंत्र व अंतिम संधी द्यावी,  लाभ बंद होणार नाही, याबाबत स्पष्ट व लेखी परिपत्रक काढावे,  अर्जातील त्रुटी महिलांना सोप्या व समजण्याजोग्या भाषेत समजावून सांगाव्यात,  महिलांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लावू नये आदी मागण्या केल्या. तसेच एका महिन्यात तांत्रिक अडचणी दूर न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top