Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

foot pilgrimage :‘गण गण गणात बोते’च्या गजरात पान्हेरा खेडी–शेगाव पायदळ दिंडीचा भक्तिमय समारोप

foot pilgrimage : तालुक्यातील पान्हेरा खेडी ते श्रीक्षेत्र शेगाव या पारंपरिक पायदळ दिंडीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने आयोजन करण्यात आले होते. १७ जानेवारी रोजी सुरू झालेली दिंडी मंगळवार, २० जानेवारी रोजी श्री गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगाव येथे दाखल झाली. ‘गण गण गणात बोते’ च्या जयघोषात वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते. शेगाव येथे दिंडीचे भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

 

foot pilgrimage

मोताळा : तालुक्यातील पान्हेरा खेडी ते श्रीक्षेत्र शेगाव या पारंपरिक पायदळ दिंडीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने आयोजन करण्यात आले होते. १७ जानेवारी रोजी सुरू झालेली दिंडी मंगळवार, २० जानेवारी रोजी श्री गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगाव येथे दाखल झाली. ‘गण गण गणात बोते’ च्या जयघोषात वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते. शेगाव येथे दिंडीचे भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

या दिंडीत शेकडो भक्तगण सहभागी झाले होते. पान्हेरा खेडी येथून निघालेली दिंडी रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ, परडा, शिरवा मार्गे प्रवास करत १७ जानेवारी रोजी कोथळी येथे पोहोचली, जिथे दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले. १८ जानेवारी रोजी दिलीपसेठ राठी, नंदकिशोर बावस्कर व सुधाकर पाटील यांनी भाविकांसाठी भोजन व चहापाण्याची व्यवस्था करून दिंडीचे आदरातिथ्य केले.

यानंतर दिंडी पिंपळगाव राजा मार्गे खामगाव येथे पोहोचली, तेथे मुक्काम करण्यात आला. १९ जानेवारी रोजी दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आणि अखेर २० जानेवारी रोजी श्रीक्षेत्र गजानन महाराज मंदिर, शेगाव येथे दिंडीचा भक्तिमय समारोप झाला.

दिंडीच्या संपूर्ण प्रवासादरम्यान किर्तन व भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या यशस्वी आयोजनासाठी विजय राहणे, गजानन गारवे, निना वैराळकर, गणेश खाडे, विलास गाळणे, श्रीकृष्ण बोराटे, मंगल बडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

भक्ती, शिस्त आणि सेवाभाव यांचा संगम असलेली ही पायदळ दिंडी गजानन महाराजांच्या नामस्मरणात पूर्णत्वास गेली, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top