Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Balapur Municipal Council : बाळापूर न.प. शिक्षण विभागातर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार 

Balapur Municipal Council : नगर परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपाध्यक्षा, समिती सभापती तसेच नगरसेवकांच्या सन्मानार्थ नगर परिषद सभागृहात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Balapur Municipal Council

शाळांच्या दर्जोन्नतीसाठी ठोस निर्णय; वर्गवाढ व नवीन शाळांच्या प्रस्तावांना मंजुरी

जाकीर अहमद

बाळापूर : नगर परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपाध्यक्षा, समिती सभापती तसेच नगरसेवकांच्या सन्मानार्थ नगर परिषद सभागृहात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

अलीकडेच नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांना विविध विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्या अनुषंगाने शिक्षण सभापती पदाची जबाबदारी डॉ. सामिया शजर मोहम्मद फैय्याज अन्सारी यांच्याकडे देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागामार्फत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. आफरीन परवीन होत्या. प्रारंभी सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी मोहम्मद कलीम यांनी शिक्षण विभागाच्या कार्यांची सविस्तर माहिती सादर केली. तसेच नगर परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांच्या इमारती, खेळाची मैदाने व भौतिक सुविधांमधील कमतरता मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिल्या.

कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना उपनगराध्यक्ष सुरेंद्र धोपटे, नगरसेवक मोहम्मद अकरम, माजी नगरसेवक डॉ. मोहम्मद फैय्याज अन्सारी, माजी नगराध्यक्ष जम्मू सेठ तसेच शिक्षण सभापती डॉ. सामिया शजर यांनी स्पष्ट केले की, जनतेने त्यांना शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने निवडून दिले आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्व शाळांना चांगल्या इमारती व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सामिया शजर यांनी शिक्षक व शिक्षिकांना वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर दिला. तसेच येत्या शैक्षणिक सत्रापासून नगर परिषदेच्या सर्व मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये वर्गवाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. सध्या ज्या शाळांमध्ये इयत्ता १ ते ४ आहेत, तेथे इयत्ता ५ सुरू करण्यात येईल, तर ज्या शाळांमध्ये इयत्ता १ ते ७ आहेत, तेथे इयत्ता ८ सुरू केली जाणार आहे. याशिवाय शहरातील ज्या भागांमध्ये प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी नवीन नगर परिषद शाळा सुरू करण्याचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले आहेत.

माजी नगराध्यक्ष जम्मू सेठ यांनी आपल्या भाषणात सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येतील व शैक्षणिक कामकाजावर बारकाईने देखरेख ठेवली जाईल, असे सांगितले. कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कार्यक्रमास आरोग्य सभापती बलबीरसिंग खोरिया, रहमतउल्लाह खान, नसीर हुसैन, अमजद हुसैन, अब्दुल गुफरान सज्जाद, अर्पिता शरद उमाळे, संजय उमाळे, अबू तल्हा, शहीद परवेज खान, मोहम्मद सऊद, डॉ. फरहान, अरबाज खान, अब्दुल रहीम, अब्दुल एजाज, अब्दुल सादिक, सलीम कुरैशी, मोहम्मद सज्जाद यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर परिषदेचे सहायक शिक्षक आसिफ मुस्तफा यांनी केले, तर आभार प्रदर्शन अब्दुल मजीद यांनी केले. यावेळी नगर परिषदेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षण विभागातील लिपिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top