Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Shivsai Vidyalaya :शिवसाई विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात  

Shivsai Vidyalaya : शिवसाई ज्ञानपीठ, मासरूळ व उच्च माध्यमिक विद्यालय, मासरूळ येथे दिनांक २ फेब्रुवारी २०२६, सोमवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून मान्यवर व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

Shivsai Vidyalaya

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

मासरूळ : शिवसाई ज्ञानपीठ, मासरूळ व उच्च माध्यमिक विद्यालय, मासरूळ येथे दिनांक २ फेब्रुवारी २०२६, सोमवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून मान्यवर व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘छावा’ चित्रपटातील दृश्य सादर करून उपस्थितांना भावनिक केले. भारतीय सैनिकांच्या जीवनावर आधारित नृत्य, शेतकरी नृत्य, भारुड, कीर्तन, बतावणी, एकांकिका, गायन आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संमेलनाची रंगत वाढवली. याशिवाय महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्यांचा सन्मानही या प्रसंगी करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई परिवाराचे संस्थापक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य डी. एस. लहाने होते. कार्यक्रमाचे उद्घाटन धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार   प्रताप भोस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष   डी. बी. नरवाडे, मुख्याध्यापक प्रमोद मोहरकर, मुख्याध्यापिका संगीता नरवाडे, कवी किशन कापरे, सरपंच पुत्र   मधुकर महाले, उपसरपंच पुत्र श्री. संदीप काटोले, माजी सरपंच  शेषराव सावळे, पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर, माजी सरपंच   मधुकर सिनकर, ग्रामपंचायत सदस्य  गजानन लांडे,   कृष्ण सिनकर, तंटामुक्ती अध्यक्ष   बाळू सपकाळ,   शरद देशमुख,   भगवान पवार, पत्रकार   किरण देशमुख,   संजय देशमुख,   किरण उगले,   पंडित सावळे,   प्रकाश लांडे, पोलीस कर्मचारी   मोकासे  आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश आस्वार व प्रा. विनोद गवते यांनी केले. प्रास्ताविकात प्राचार्य अरुण भगवान गुळवे यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच मोबाईलपासून दूर राहण्याचा अनमोल संदेश देण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डी. एस. लहाने यांनी समाजात विधवांना मान-सन्मान देण्याचे महत्त्व उपस्थित महिलांना पटवून दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक श्री. सुखदेव नरवाडे, श्री. कैलास सिनकर, प्रा. उत्तम कांबळे, प्रा. हरिदास देवकर, सोशल मीडिया प्रमुख श्री. प्रतीक जाधव, श्री. योगेश लोखंडे, सौ. कोमल लांडे, सौ. मनिषा वानरे, कु. प्रीती जाधव, कु. वैष्णवी खोलगडे, अंजना सपकाळ, श्री. किरण सिनकर, श्री. विठ्ठल दळवी, सागर भागवत, विष्णू बोडखे, श्री. संजय कळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी संस्थेच्या वतीने श्री. डी. बी. नरवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top