birth anniversary celebration : संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त धोत्रा नंदाई फाट्यावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी चहापाण्याची व्यवस्था गजानन भालेकर यांनी केली, तर वाकी बुद्रुक येथील रामेश्वर चेके व नारायण जाधव (धोत्रा नंदाई) यांनी दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे वितरण केले. परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

धोत्रा नंदाई : संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त धोत्रा नंदाई फाट्यावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी चहापाण्याची व्यवस्था गजानन भालेकर यांनी केली, तर वाकी बुद्रुक येथील रामेश्वर चेके व नारायण जाधव (धोत्रा नंदाई) यांनी दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे वितरण केले. परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
रविवारी श्रींच्या प्रतिमेची गावातून टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावापासून ते धोत्रा फाटा मंदिरापर्यंत ही मिरवणूक पार पडली. त्यानंतर सकाळपासून महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

