Sumo hit a truck: भरधाव सुमो समोरील ट्रकवर आदळल्याने दोन जण जखमी झाले.ही घटना डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल शेरे पंजाबजवळ ७ नोव्हेंबर रोजी घडली.

हॉटेल शेरे पंजाब परिसरात घडला अपघात; पोलिसांनी दाखवली तत्परता
डोणगाव : भरधाव सुमो समोरील ट्रकवर आदळल्याने दोन जण जखमी झाले.ही घटना डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल शेरे पंजाबजवळ ७ नोव्हेंबर रोजी घडली.
मेहकरकडे जाणारी टाटा सुमो (क्रमांक MH 12 GF 8679) ही त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रकवर मागून जाऊन आदळली. या धडकेत सुमोमधील दोघे प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलिस स्टेशनचे हर्ष सहगल व कुंडलिक वाळले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना त्वरित मेहकर येथील रुग्णालयात हलवले. वृत्त लिहीपर्यंत अपघाताबाबत डोणगाव पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल झालेली नव्हती तसेच जखमींची नावे अद्याप समजू शकली नव्हती, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

