Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Students: तब्बल 26 वर्षांनंतर एकत्र आले ‘कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालय’चे विद्यार्थी

Students: काळाच्या ओघात आयुष्याच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या, कोणी डॉक्टर झाले, कोणी पत्रकार, तर कोणी पोलिस अधिकारी… पण त्या शाळेच्या आठवणी मात्र सगळ्यांच्या मनात आजही जशाच्या तशा आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर ‘कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालय’ आपोती खुर्दचे 1998-99 च्या तुकडीतील विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींनी क्षणभर काळ थांबला.

Students

अकोला : काळाच्या ओघात आयुष्याच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या, कोणी डॉक्टर झाले, कोणी पत्रकार, तर कोणी पोलिस अधिकारी… पण त्या शाळेच्या आठवणी मात्र सगळ्यांच्या मनात आजही जशाच्या तशा आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर ‘कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालय’ आपोती खुर्दचे 1998-99 च्या तुकडीतील विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींनी क्षणभर काळ थांबला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेतकरी सदन येथे उत्साह, भावूकता आणि आनंदाने भारलेले हे स्नेहमिलन पार पडले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या विद्यालयाचे माजी शिक्षक मोरडकर सर यांनी विद्यार्थ्यांकडे पाहत भावूक होत सांगितले, की
“प्रत्येक गुरुला आपल्या विद्यार्थ्याने आयुष्यात उच्च शिखर गाठले की दिलेल्या शिकवणीचे चीज झाल्याचा आनंद होतो. आज तुम्हा सगळ्यांकडे पाहून तोच आनंद माझ्या डोळ्यांतून अश्रू बनून बाहेर येतो आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपोतीकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले,
“माझा प्रत्येक विद्यार्थी घडत गेला, बदलत गेला… पण आजही त्याच्यातील माणूसपण, नम्रता आणि संस्कार तसेच आहेत. हेच आमच्या शिक्षणाचं खरं फळ आहे.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  ज्योती तराळे यांनी मोलाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत तराळे यांनी उत्तमरीत्या केले, कार्यक्रमाचे दिमाखदार प्रास्ताविक विजय देशमुख यांनी केले तर आभारप्रदर्शन पञकारी दुनियेतील दिमाखदार भाषेने मंगेश तरोळे व सचिन गोमासे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता अशोक आपोतीकर, वैशाली उमाळे, मंगला आढे, मिना भांडे, अनिल वानखडे, नंदु बोपटे, यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि ओठांवर आठवणींचे हास्य झळकत होते. कुणी वर्गातील खोड्या सांगत हसत होते, तर कुणी शिक्षकांच्या टोमण्यांवर मनमुराद बोलत होते.
शाळेतील त्या बालपणाच्या आठवणींनी सगळ्यांचे मन भरून आले आणि निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
असे हे स्नेहमिलन ‘कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालय’च्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top