Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Strict shutdown : चिखला प्रकरणाच्या निषेधार्थ देऊळगाव मही येथे कडकडीत बंद; आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

Strict shutdown : लोणार तालुक्यातील चिखला येथे घडलेल्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव मही येथे सर्वपक्षीय पक्ष व सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटवण्याच्या वादातून दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Strict shutdown

देऊळगाव मही : लोणार तालुक्यातील चिखला येथे घडलेल्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव मही येथे सर्वपक्षीय पक्ष व सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटवण्याच्या वादातून दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

चिखला (ता. लोणार) येथील संजीवनी वाघ यांच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव मही येथे सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी बंदची हाक दिली. व्यापाऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून घोषणाबाजी केली.

यावेळी गणेश शिंगणे, गजेंद्र शिंगणे, वसुदेव पाटील, डॉ. महेश दंदाले, संदीप राऊत, किशोर शिंगणे, गणेश शेळके, कैलास राऊत, बळीराम शिंगणे, कारभारी देढे, राम शिंगणे, देवा शिंगणे, पुरुषोत्तम शिंगणे, तुळशीराम पंडित, शिवहरी शिंगणे आदींनी निषेध व्यक्त केला.

आरोपींना तात्काळ अटक करून कठोर व कायदेशीर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वपक्षीय नेत्यांनी देऊळगाव येथील पोलीस चौकीत जाऊन निवेदन सादर केले. दोषींवर तात्काळ कारवाई करून पीडितेला न्याय व संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. लोणार तालुक्यातील वातावरण सध्या तणावपूर्ण असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

महापुरुषांना जातीजातीत विभागण्याचे काम बंद करावे, त्यामुळे हिंदू समाजाचे नुकसान होत आहे – प्रतापराव जाधव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top