Strict shutdown in Chikhli : चिखला काकड (ता. लोणार) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वादातून संजीवनी वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ २३ फेब्रुवारी रोजी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला.

चिखली : चिखला काकड (ता. लोणार) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वादातून संजीवनी वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ २३ फेब्रुवारी रोजी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला.
चिखला प्रकरणाच्या निषेधार्थ देऊळगाव मही येथे कडकडीत बंद; आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, किरकोळ दुकाने, व्यापारी आस्थापने, हॉटेल्स तसेच इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. प्रमुख चौकांमध्ये आंदोलकांनी एकत्र येत निषेध नोंदविला. घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून न्याय द्यावा; अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, बंद शांततेत पार पडला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांनीही संयम व सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकूणच, या बंदमधून शहरातील नागरिकांनी घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

