Mahabreaking

[breaking_news]

Ganesh Mandals :बीबीतील गणेश मंडळांची ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी केली पाहणी

Ganesh Mandals : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन सोनटक्के व पोलीस कर्मचाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी बीबी शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली.

Ganesh Mandals

गणेश विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त करा; पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

रमेश खंडागळे

बीबी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन सोनटक्के व पोलीस कर्मचाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी बीबी शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली.

गणरायाच्या आगमनाने बीबी शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, तसेच उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्यांना दिल्या.

गणेशोत्सव हा भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, कर्कश आवाजातील डीजे, नशा करून धिंगाणा घालणे तसेच उत्सवाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

गणेश विसर्जन मिरवणुका डीजेमुक्त ठेवून पारंपरिक वाद्यांच्या साथीने शांततेत काढाव्यात आणि प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेत मिरवणूक पूर्ण करावी, असे आवाहन ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी केले. गणेश मंडळांना पोलिसांचे आवश्यक सहकार्य राहील; मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची गणेश भक्तांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

उत्सवाच्या काळात नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास सण अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात साजरे करता येतात. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top