Mahabreaking

[breaking_news]

Special round announced: डी.एल.एड. प्रवेशासाठी विशेष फेरी जाहीर; १२ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

Special round announced: राज्यातील अध्यापक विद्यालयांमधील रिक्त जागा भरण्यासाठी डी.एल.एड. प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना दि. १२ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. संबंधित जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, या विशेष फेरीतील प्रवेश ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दिले जाणार आहेत.

Special round announced

  अध्यापक विद्यालयांच्या रिक्त जागांसाठी डी.एल.एड.ची विशेष प्रवेश फेरी; ‘फर्स्ट कम, फर्स्ट प्रेफरन्स’ने प्रवेश

बुलढाणा : राज्यातील अध्यापक विद्यालयांमधील रिक्त जागा भरण्यासाठी डी.एल.एड. प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना दि. १२ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. संबंधित जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, या विशेष फेरीतील प्रवेश ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दिले जाणार आहेत.

add

या विशेष फेरीत इयत्ता १२ वी उत्तीर्ण होऊन प्रथमच डी.एल.एड. प्रवेशासाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी, नियमित प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज पूर्ण न भरलेले किंवा अर्जात आवश्यक दुरुस्ती न केलेले विद्यार्थी, तसेच यापूर्वीच्या कोणत्याही प्रवेश फेरीत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.

नियमित प्रवेश प्रक्रियेत अध्यापक विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध रिक्त जागांनुसार आपल्या पसंतीक्रमात बदल करून संबंधित अध्यापक विद्यालयांचा समावेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी डी.एल.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन शुल्क भरलेले असले, मात्र प्रत्यक्ष प्रवेश घेतला नसलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीसाठी पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही. मात्र, पूर्वी नोंदविलेलाच ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक वापरणे बंधनकारक राहणार आहे.

अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमधील सातव्या टप्प्यात जाऊन “Click to Find Seat & Take Admission” या पर्यायाद्वारे विभाग, जिल्हा आणि अध्यापक विद्यालयाचा प्रकार निवडून रिक्त जागा असलेल्या संस्थेत प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित विद्यालयाची खात्री करूनच “Yes Confirm Seat” या पर्यायावर क्लिक करावे. एकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून चार दिवसांच्या आत संबंधित अध्यापक विद्यालयात आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • दि. ८ ते १२ जुलै २०२६ : विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज सादर करणे
  • दि. १३ जुलै २०२६ : पडताळणी अधिकाऱ्यांकडून ऑनलाइन प्रमाणपत्र पडताळणी
  • दि. १४ जुलै २०२६ : दुपारी २ वाजेपर्यंत अर्जातील दुरुस्ती व सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुरुस्त अर्जांची अंतिम पडताळणी
  • दि. १५ जुलै २०२६ : सायंकाळी ६ वाजेपर्यंत अध्यापक विद्यालय निश्चित करून प्रवेशपत्र डाउनलोड करणे
  • दि. २० जुलै २०२६ : सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित अध्यापक विद्यालयांकडून विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे

इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत एमएए संकेतस्थळ वर अर्ज करून या विशेष प्रवेश फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top