Mahabreaking

🔴 BREAKING
18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू Saral portal :सरल पोर्टलवर माजी विद्यार्थी संघांच्या उपक्रमांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक Competition with private schools :खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Salgadi : सालगड्यासाठी गावोगावी ‘शोधा-शोध’; पॅकेज सव्वालाखांवर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू Saral portal :सरल पोर्टलवर माजी विद्यार्थी संघांच्या उपक्रमांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक Competition with private schools :खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Salgadi : सालगड्यासाठी गावोगावी ‘शोधा-शोध’; पॅकेज सव्वालाखांवर

Soybean procurement  : देऊळगाव मही येथे सोयाबीन खरेदीस उत्साहात शुभारंभ; प्रथम शेतकऱ्यांचा सत्कार

Soybean procurement  : देऊळगाव मही येथे हंगाम २०२५–२६ साठी शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबीन खरेदीसाठी सर्वप्रथम केंद्रावर माल घेऊन आलेले शेतकरी  राजकुमार सखाराम गवई व   बबन प्रभू गवई (रा. जवळखेड) यांचा संस्थेच्या वतीने पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Soybean procurement
गजानन भालेकर

धोत्रा नंदाई  :  देऊळगाव मही येथे हंगाम २०२५–२६ साठी शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबीन खरेदीसाठी सर्वप्रथम केंद्रावर माल घेऊन आलेले शेतकरी  राजकुमार सखाराम गवई व   बबन प्रभू गवई (रा. जवळखेड) यांचा संस्थेच्या वतीने पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या शुभारंभ कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष साईनाथ नागरे, तसेच संचालक श्रीकृष्ण लहाने, सारंगधर तिडके, पुंजाजी चित्ते, विनोद सरोदे, शिवाजी कोल्हे, रवींद्र काकडे, गबाजी शेरे, सदाशिव मुंडे, देवराव पारेकर, विष्णू झोरे, अशोक खाडे व द्वारकाबाई म्हस्के उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्री. राजू पठाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर कर्मचारी सिद्धू कुरंगल यांनी खरेदी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना अध्यक्ष परमेश्वर शिंदे यांनी सांगितले की, शासनाच्या आधारभूत किंमत योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य दर मिळतो. शेतकऱ्यांनी दलालांवर अवलंबून न राहता थेट खरेदी केंद्रावर आपला माल विक्रीस आणावा, असे आवाहन त्यांनी केले. खरेदी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असून वजन व दर्जा तपासणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपाध्यक्ष साईनाथ नागरे यांनी खरेदी केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभारंभानंतर सोयाबीन खरेदीस प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top