Skill Development: बुलढाणा जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर २०२६ रोजी शालेय जिल्हास्तरीय वुशु क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत देऊळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला.

देऊळगाव राजाच्या वुशुपटूंची दमदार कामगिरी; सात खेळाडूंनी पटकावले प्रथम क्रमांक
गजानन तिडके
देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर २०२६ रोजी शालेय जिल्हास्तरीय वुशु क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत देऊळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत मैथिली तायडे, मयुरी थेटे, अरुण शिवरकर, मिलिंद शिवरकर, आरुष हटकर, राघव झोरे आणि निलेश शिवरकर यांनी आपल्या-आपल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे या सातही खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तर हरिओम रामाने, ओम झोरे, निळकंठ वारुळे आणि गौरव पाबळे यांनी आपल्या गटात द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
चुरशीच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी कौशल्य, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट क्रीडाशिस्तीचे प्रदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे देऊळगाव राजा शहराच्या क्रीडा क्षेत्राची जिल्हास्तरावर पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले. विभागीय स्तरावरील स्पर्धेतही अकॅडमीचे खेळाडू चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास प्रशिक्षक राजेश खांडेभराड यांनी व्यक्त केला.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

