Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Siddhalinga Shivacharya Maharaj : सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Siddhalinga Shivacharya Maharaj : सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Siddhalinga Shivacharya Maharaj
डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्टतर्फे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे गौरव सोहळा

साखरखेर्डा : आध्यात्मिक, धार्मिक आणि सेवाभावी वृत्तीने समाजसेवेत स्वतःचे आयुष्य समर्पित करणाऱ्या महाराष्ट्रातील धर्मगुरूंना दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती वेदांतचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांना प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात आला.
दि. २६ डिसेंबर रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांना सन्मानपूर्वक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवनप्रवासात अनेक चढउतार आले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी मठात पदार्पण केले. बालपणापासूनच धार्मिक व आध्यात्मिक शिक्षण घेत समाजाशी आणि मठाशी ते एकरूप झाले. सन १९७२ मध्ये त्यांची श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर विरशैव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अखंड कार्य केले.
त्यांच्या नेतृत्वाखाली मठात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. सर्वधर्मसमभावाचे महाशिबीर आयोजित करून “मानव हा सर्वश्रेष्ठ असून परस्पर सहकार्य हीच खरी मानवता” असा संदेश त्यांनी समाजाला दिला. आज या मठाचे कार्य देशभरात विस्तारले असून त्यांच्या अधिपत्याखाली अनेक मठ कार्यरत आहेत. मठाचा सर्वांगीण कायापालट करत हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी धार्मिक व आध्यात्मिक शिक्षण दिले आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्टच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅरड. नाझेर काझी, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झवर, डॉ. अमजदखान पठाण, अयाज खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कर्करोग तपासणी महाशिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारण्याचा मान मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी स्वीकारला. श्रद्धा, सेवा आणि समतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top