Shri Venkatesh College : श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. बी.एस्सी. तृतीय वर्षाचा एकूण निकाल ९१.८६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम; प्राविण्य श्रेणीत १७ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. बी.एस्सी. तृतीय वर्षाचा एकूण निकाल ९१.८६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या परीक्षेसाठी एकूण १२३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. विशेष म्हणजे १७ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत यश मिळवत महाविद्यालयाची मान उंचावली आहे.
बायो ग्रुपमध्ये चमकदार यश
बायो ग्रुपमध्ये पायल सतीश म्हस्के हिने ७८.०५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. पायल बद्रिनारायण मांटे हिने ७४.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर आकांक्षा सुरेश उकरडे हिने ७३.९४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
मॅथ्स ग्रुपमध्ये विद्यार्थिनींची आघाडी
मॅथ्स ग्रुपमध्ये आयेशा परवीन फेरोज शेख हिने ८०.०९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. राफिया जब्बार शेख हिने ७४.८३ टक्के गुणांसह द्वितीय, तर जिशान जावेद खान याने ७३.४९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव तसेच प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा अधिक दृढ झाली असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

