Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Shri Gajanan Maharaj :अमेरिकेतही श्री गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्साहात साजरा

Shri Gajanan Maharaj : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांचा प्रगटदिन महोत्सव अमेरिकेतील ऑर्लॅंडो येथे हिंदू सोसायटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा मंदिरात अत्यंत उत्साह व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

Shri Gajanan Maharaj

ऑर्लॅंडो /डोणगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांचा प्रगटदिन महोत्सव अमेरिकेतील ऑर्लॅंडो येथे हिंदू सोसायटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा मंदिरात अत्यंत उत्साह व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सागर सावजी व डॉ. नेहा सावजी यांच्या हस्ते अभिषेक व पूजेसह झाली. त्यानंतर सामूहिक पारायण, भजन व आरतीचे आयोजन करण्यात आले. अमेरिकेसारख्या दूरदेशी शेकडो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.

या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन मूळ डोणगाव निवासी व माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांचे बंधू प्रशांत सावजी व सौ. मीनल सावजी यांनी केले. महाप्रसादाच्या तयारीसाठी नूतन ओक, सुयशा गुळगुळे, सुरभी महाजन, कल्पना कीर्तने आणि नयना कावळे यांनी विशेष सहकार्य केले.

महाराजांच्या कृपेने यंदाचाही कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. महाराजांची कृपा सर्वांवर सदैव राहो, अशी प्रार्थना भाविकांनी श्रींच्या चरणी अर्पण करत कार्यक्रमाची सांगता केली.

डोणगाव येथे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पूर्वी सुबोधभाऊ सावजी यांच्या शासकीय निवासस्थानी हत्ती-घोड्यांसह झालेले आगमन तसेच सुमारे ३६ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रशांत सावजी यांनी तेथेही अखंडपणे सुरू ठेवलेला प्रगटदिन उत्सव, ही त्यांची महाराजांवरील अखंड श्रद्धा आणि भारतीय संस्कारांची जपणूक असल्याची चर्चा भाविकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top