Mahabreaking

[breaking_news]

Shri Balaji Maharaj :देऊळगाव राजात श्री बालाजी महाराजांचा यात्रोत्सव; ११ ऑक्टोबरला घटस्थापना

Shri Balaji Maharaj : ऐतिहासिक परंपरा लाभलेले आणि लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री बालाजी महाराजांचा वार्षिक यात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह राज्याच्या सीमारेषा ओलांडून श्री बालाजी महाराजांच्या चरणी माथा टेकविण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक देऊळगाव राजा येथे दाखल होत असतात.

Shri Balaji Maharaj

श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी; ११ ऑक्टोबरपासून यात्रोत्सवाला प्रारंभ

गजानन तिडके

देऊळगाव राजा : ऐतिहासिक परंपरा लाभलेले आणि लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री बालाजी महाराजांचा वार्षिक यात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह राज्याच्या सीमारेषा ओलांडून श्री बालाजी महाराजांच्या चरणी माथा टेकविण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक देऊळगाव राजा येथे दाखल होत असतात.

Shri Balaji Maharaj

यावर्षी यात्रोत्सवातील घटस्थापना आश्विन शु. १, रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. मंडपोत्सव आश्विन शु. ८ सह ९, सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दसरा पालखी मिरवणूक आश्विन शु. ९ सह १०, मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून बुधवार, दि. २१ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. तसेच लळीत उत्सव आश्विन कृ. ४, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.४५ वाजता सूर्योदयाच्या वेळी संपन्न होणार आहे.

आश्विन यात्रा उत्सव दि. ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत, तर कार्तिक यात्रा उत्सव दि. १० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. यात्रोत्सवादरम्यान भाविकांनी श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयंसिंह जाधव आणि व्यवस्थापक श्री किशोर बीडकर यांनी केले आहे.

यात्रोत्सवाच्या तयारीला वेग

श्री बालाजी महाराजांच्या वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थानसह श्रींचे भक्तही तयारीला लागले आहेत. दरवर्षी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातम्या, जाहिराती, लेख, संकलित माहिती आदींच्या माध्यमातून श्रींच्या उत्सवाचा आणि यात्रेचा सर्वदूर प्रचार व प्रसार करणाऱ्या पत्रकारवृंदाकडून यंदाही प्रभावी प्रचार-प्रसाराचे नियोजन करण्यात येणार आहे.

यासाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने सर्व पत्रकार बंधू-भगिनींच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. यात्रोत्सवाच्या प्रचार-प्रसाराबाबत यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच श्री बालाजी महाराजांच्या सर्वे नंबर ९८ वरील यात्रेच्या नियोजनासाठी श्री बालाजी संस्थान पुरस्कृत जागावाटप समितीच्या सदस्यांची अंतर्गत सहविचार सभा आयोजित करण्यात आली. यात्रेच्या नियोजनासंदर्भात आवश्यक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.

व्यवस्थापन आराखडा व SOP साठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शासनाच्या परिपत्रकांनुसार यात्रेचा व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करून त्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या काळात विविध विभागांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबरोबरच उत्सव आणि यात्रेसाठी आवश्यक परवानग्या मिळाव्यात, यासाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने सविस्तर पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे.

यंदाचा यात्रोत्सव सुरळीत, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी संस्थान, प्रशासन, विविध विभाग तसेच भाविकांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top