Mahabreaking

[breaking_news]

Mother Hires Contract Killer :धक्कादायक अनैतिक संबंधांत अडसर ठरलेल्या मुलाची आईनेच दिली सुपारी

Mother Hires Contract Killer :अनैतिक संबधात अडसर ठरत असलेल्या मुलाची आईनेच सुपारी देवून हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोणार तालुक्यातील वढव येथील तरुणाची हिंगाली जिल्ह्यातील सेनगाव हद्दीत हत्या करण्यात आली आहे. जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने मुलाच्या हत्येची  २५ हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईसह तिघांना अटक केली आहे.  सचिन रामकिशन राजगुरू (वय ३०, रा. वढव ता. लोणार) असे मृतक युवकाचे नाव आहे.

Mother Hires Contract Killer

लोणार तालुक्यातील वढव येथील तरुणाची हिंगोली जिल्ह्यात हत्या; आईसह तिघांना अटक

हिंगोली/बुलढाणा : अनैतिक संबधात अडसर ठरत असलेल्या मुलाची आईनेच सुपारी देवून हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोणार तालुक्यातील वढव येथील तरुणाची हिंगाली जिल्ह्यातील सेनगाव हद्दीत हत्या करण्यात आली आहे. जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने मुलाच्या हत्येची  २५ हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईसह तिघांना अटक केली आहे.  सचिन रामकिशन राजगुरू (वय ३०, रा. वढव ता. लोणार) असे मृतक युवकाचे नाव आहे.

सचिन राजगुरू यांच्या वडिलांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. घटस्फोटानंतर तो त्याची आई लिलाबाई आणि साडेतीन वर्षांची मुलगी संचिता यांच्यासोबत राहत होता. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक तणावामुळे सचिन मानसिकदृष्ट्या त्रस्त होता. याच काळात त्याची आई लिलाबाई राजगुरू हिचे राशन दुकानदार रामदास तनपुरे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा तपासात उल्लेख समोर आला. या संबंधांमध्ये सचिन अडथळा ठरत असल्याने त्याला कायमचे दूर करण्याचा कट रचण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नरेश पवार (रा. वडद) याला २५ हजार रुपयांची सुपारी दिली. घटनेच्या दिवशी रामदास आणि नरेश यांनी सचिनला मोटारसायकलवरून सेनगाव हद्दीत नेले. तेथे मद्यधुंद अवस्थेत त्याच्यावर हल्ला करत उमरदरी पाटीजवळ दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. ओळख पटू नये म्हणून मृतदेह नाल्यात फेकून आरोपी पसार झाले. मात्र मृताच्या शरीरावरील टॅटूच्या धाग्यामुळे ओळख पटली आणि तपासाला वेग आला.

स्थानिक गुन्हे शाखा आणि सेनगाव पोलिसांनी तांत्रिक तपास, चौकशी आणि हालचालींचे विश्लेषण करत या षड्यंत्राचा उलगडा केला. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top