Mahabreaking

[breaking_news]

Shocking incident :लोणी गवळीमध्ये वृक्षचोरीचा धक्कादायक प्रकार; ४० हजारांचे सागवान लाकूड लंपास

Shocking incident : लोणी गवळी येथील सरकारी ‘ई’ वर्ग जमिनीवरील सागवानाची तब्बल १९ झाडे अज्ञात चोरट्यांनी विनापरवानगी तोडून त्यांचे लाकूड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या झाडांचे अंदाजे बाजारमूल्य ४० हजार रुपये असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तलाठी तथा ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून १४ ऑक्टोबर रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

dongaon

सरकारी वृक्षसंपत्ती चोरट्यांच्या निशाण्यावर; १९ सागवानाची झाडे तोडून लाकूड गायब

डोणगाव : लोणी गवळी येथील सरकारी ‘ई’ वर्ग जमिनीवरील सागवानाची तब्बल १९ झाडे अज्ञात चोरट्यांनी विनापरवानगी तोडून त्यांचे लाकूड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या झाडांचे अंदाजे बाजारमूल्य ४० हजार रुपये असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तलाठी तथा ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून १४ ऑक्टोबर रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

virechana

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी गवळी येथील भाग क्रमांक २ चे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी नियमित क्षेत्रीय पाहणी करीत असताना मौजे लोणी गवळीच्या हद्दीतील सरकारी ‘ई’ वर्ग जमिनीची पाहणी केली. यावेळी गट क्रमांक ५३३, ५५४ आणि ५५५ मधील सागवानाची उभी झाडे बेकायदेशीररीत्या तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अज्ञात चोरट्यांनी कोणतीही परवानगी न घेता सागवानाची झाडे तोडून त्यांचे लाकूड घटनास्थळावरून पळवून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करून लाकूड चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सरकारी मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सरकारी जमिनीवरील मौल्यवान वृक्षांची अवैध तोड करून त्यांचे लाकूड चोरीला जाण्याच्या या प्रकारामुळे शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारी जमिनीवरील वृक्षसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

या प्रकरणी तलाठी तथा ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम २६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदारांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक आजमिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सरकारी जमिनीवरील सागवानाची झाडे तोडून लाकूड लंपास करणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top