Mahabreaking

[breaking_news]

Principal Gulve :शिवसाई विद्यालयाचे प्राचार्य गुळवे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित      

Principal Gulve : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रभावी शैक्षणिक नेतृत्वाची दखल घेत शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालय, मासरूळ येथील प्राचार्य प्रा. ए. बी. गुळवे यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र सह्याद्री रत्न आदर्श प्राचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

Principal Gulve

शैक्षणिक नेतृत्वाचा गौरव; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदानाची दखल

मासरूळ : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रभावी शैक्षणिक नेतृत्वाची दखल घेत शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालय, मासरूळ येथील प्राचार्य प्रा. ए. बी. गुळवे यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र सह्याद्री रत्न आदर्श प्राचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

हा राज्यस्तरीय पुरस्कार १४ जून २०२६ रोजी पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले, राष्ट्रपती पुरस्कार व पद्मविभूषण सन्मानप्राप्त तबलावादक डॉ. प्रकाश गायकवाड, अभिनेत्री आर्या घारे, मराठी चित्रपट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन धवणे पाटील तसेच अभिनेत्री कोमल बोडके उपस्थित होत्या.

प्रा. गुळवे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले बहुमूल्य योगदान, विद्यार्थ्यांना दिलेले योग्य मार्गदर्शन, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी राबविलेले उपक्रम आणि संस्थेच्या प्रगतीसाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जात आहे.

प्रा. गुळवे यांना यापूर्वीही विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय सेवा रत्न उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ या प्रतिष्ठित सन्मानाचाही समावेश आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र सह्याद्री रत्न आदर्श प्राचार्य पुरस्कार’ हा त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील आणखी एक मानाचा तुरा मानला जात आहे.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डी. एस. लहाने, शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष डी. बी. नरवाडे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. ए. बी. गुळवे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या गौरवामुळे परिसरातील शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढला असून विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top