Shiva Dhone : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय इनलाइन स्केटिंग स्पर्धा सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे उत्साहात पार पडल्या.

स्केटिंगमध्ये शिवाची दमदार भरारी; जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, विभागीय स्पर्धेसाठी निवड
पातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय इनलाइन स्केटिंग स्पर्धा सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत पातूर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी शिवा सचिन ढोणे याने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे त्याची आगामी विभागीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिवा ढोणे याने मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विद्यालयासह पातूर तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे.
शिवाच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. सपना ताई म्हैसणे, संस्थेचे सचिव सचिन ढोणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. डी. कंकाळ सर, क्रीडाशिक्षक पी. एम. ननीर व एन. एस. इंगळे, तसेच हर्षल ढोणे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.
यावेळी आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शिवाला शुभेच्छा देत त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. विभागीय स्तरावरही शिवाने उत्तम कामगिरी करून विद्यालयासह पातूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

