Sexual harassment : पातूर तालुक्यातील चान्नी ठाणे हद्दीतील एका गावातील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी चान्नी पोलिसांनी सुरेश वासुदेव पिंपळकार याच्याविरुद्ध १२ फेब्रुवारीच्या रात्री गुन्हा दाखल केला आहे.

अकोला : पातूर तालुक्यातील चान्नी ठाणे हद्दीतील एका गावातील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी चान्नी पोलिसांनी सुरेश वासुदेव पिंपळकार याच्याविरुद्ध १२ फेब्रुवारीच्या रात्री गुन्हा दाखल केला आहे.
पीडित विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून तिला त्रास देत होता. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी आरोपीने तिच्या घरासमोर शिवीगाळ करत मारहाण केली व विनयभंग केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने १२ फेब्रुवारीच्या रात्री थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस तातडीने अटक करावी, अशी मागणी होत आहे.

