Mahabreaking

[breaking_news]

Search for kidnapped girl:अपहरण झालेल्या बालिकेचा लावला शोध

Search for kidnapped girl: डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत अपहरण झालेल्या बालिकेचा शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.या प्रकरणी आरोपी युवकास ताब्यात घेण्यात आले.

Search for kidnapped

बुलढाणा पोलिसांची संयुक्त कारवाई; पिंपरी-चिंचवड येथून आरोपीसह घेतले ताब्यात

बुलढाणा: डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत अपहरण झालेल्या बालिकेचा शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.या प्रकरणी आरोपी युवकास ताब्यात घेण्यात आले.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील हरवलेल्या व अपहृत बालकांच्या गुन्ह्यांची दखल घेऊन त्यांचा शोध घेण्याच्या सूचना बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन डोणगाव येथील कलम 363 भादंवि मधील पिडीत बालिकेचा शोध घेण्यात आला. या प्रकरणात आरोपी विशाल उर्फ तुषार राजू अंगोरे (वय 22, रा. पाटमोरी, ता. मेहकर) हा पिडीत बालिकेसह चाकण, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला प्राप्त झाली होती.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक व तांत्रिक विश्लेषण विभाग यांच्या पथकाने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन महाळुंगे एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या सहाय्याने संयुक्त कारवाई केली. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि स्थानिक पडताळणीच्या आधारे पथकाने पिडीत बालिका व आरोपीला शोधून ताब्यात घेतले.
त्यानंतर दोघांना डोणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन डोणगावमार्फत सुरू आहे.
ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक, बुलडाणा, डी. एन. लोढ – अपर पोलीस अधीक्षक, खामगाव,अनिल गायकवाड – अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा,पोनि सुनील अंबुलकर – प्रभारी अधिकारी, स्थानीक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात पोउपनि संजय ठाकरे, पोहेकॉ संभाजी असोलकर, पोहेकॉ सना खेडेकर, चालक पोकॉ सचिन शेंद्रे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बुलडाणा), पोहेकॉ राजु आडवे, पोकॉ कैलास ठोंबरे (तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलडाणा) यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top